आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Essar वर अंबानी बंधूंसह अनेक VVIPs च्या फोन टॅपिंगचा आरोप, मोदींकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - Essar ग्रुपवर अनेक VVIPs च्या फोन टॅपिंगचा आरोप झाला आहे. एका वकिलाने थेट नरेंद्र मोदींकडे तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे, की 2001 2006 दरम्यान फोन टॅपिंग झाले. ज्यांचे फोन टॅपिंग झाले त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यासह सुरेश प्रभू, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील पीएमओ स्टाफ, तत्कालिन सरकारमधील मंत्री प्रमोद महाजन आणि आणखी बऱ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरोप आहे की यातील काही फोन टॅपिंग टेलिकॉम लायसन्स संदर्भातील होते.

काय आहे प्रकरण
- इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, सुप्रीम कोर्टचे वकिल सुरेश उप्पल यांनी 1 जून रोजी 29 पानांची एक तक्रार पंतप्रधान कार्यालयात पाठवली होती.
- उप्पल हे Essar च्या त्या कर्मचाऱ्याचे वकिल आहेत ज्याच्यावर फोन टॅपिंगचा आरोप आहे.

कोणाचे फोन टॅप झाले
- उप्पल यांच्या तक्रारीनुसार सध्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि राम नाईक, रिलायन्स ग्रुपचे मुकेश आणि अनिल अंबानी, अनिल यांची पत्नी टीना आणि अनेक टॉप ब्यूरोक्रॅट्सचे फोन टॅप झाले होते.
- एवढेच नाही तर यात भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह, तत्कालिन होम सेक्रेटरी राजीव महर्षी, आयडीबीआय बँकेचे माजी अध्यक्ष पी.पी.व्होरा, आयडीबीआय बँकेचे माजी सीईओ आणि एमडी के.व्ही. कामत आणि याच बँकेचे माजी सह व्यवस्थापकिय संचालक ललिता गुप्ते यांचा समावेश आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ज्यांचे फोन टॅप झाले त्यांचे नंबर्स..
(Pls Note - तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)