आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Lifts Embargo On Medical Entrance Results

मेडिकल प्रवेश परीक्षा; निकाल जाहीर होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यावर असलेली स्थगिती सोमवारी सुप्रीम कोर्टाने उठवली. मात्र, राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) वैधतेबाबतचा निकाल 4 जुलैपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

कोर्टाने प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित करण्यास 13 डिसेंबर रोजी स्थगिती दिली होती. स्थगिती उठवल्याने राज्य सरकारे प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रवेश प्रक्रिया सुरू करू शकतील. सरन्यायाधीश अल्तमस कबीर, न्या. अनिल आर. दवे व विक्रमजित सेन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे.

निकालात म्हटले आहे की, रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशानंतर याच विद्यार्थ्यांना रुग्णांच्या देखभालीसाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे आधीच्या आदेशात दुरुस्ती करून निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली जात आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू सरकार व खासगी संस्थांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना 30 एप्रिल रोजी कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. ही राज्ये व संस्थांनी एमसीआयच्या प्रवेश परीक्षेच्या पद्धतीला (नीट) विरोध केला आहे.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे
गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, भारतीय चिकित्सा परिषद, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया आणि राज्य तसेच विद्यापीठे तसेच इतर संस्था एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आयोजित करू शकतील. मात्र, पुढील आदेशापर्यंत त्यांचे निकाल जाहीर करू शकणार नाहीत.