आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court May Asks Tough Questions From Italian Ambassador

इटलीच्या राजदूताला भारत सोडून जाण्याची बंदी कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय मच्छीमारांच्या हत्या प्रकरणातील इटलीच्या दोन खलाशांना परत बोलवाण्याच्या शपथपत्रातील शब्द न पाळल्याबद्दल इटलीच्या राजदूतांच्या वकीलांना सोमवारी न्यायालयाने फटकारले आहे. तुम्ही विश्वास गमावल्याचे न्यायालयाने सुनावले आहे. या प्रकरणीची सुनावणी २ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तो पर्यंत इटलीचे राजदूत डेनियल मँसिनी यांना भारत सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना राजकीय मोकळीक मिळणार नसल्याचेही सांगितले.

केरळमधील मच्छीमारांच्या हत्या प्रकरणातील मस्सीमिलीआनो लाटोरी आणि सॅल्व्हाटोर गिरोन या दोन इटालियन खलाशांवर भारतीय न्यायलयात प्रकरण प्रलंबित असताना इटलीच्या राजदूतांनी शपथपत्र दाखल करून त्यांना मायदेशी जावून येण्याची परवानगी मागितली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती मात्र, पॅरोलवर सुटका करण्यात आलेल्या या दोन्ही खलाशांनी भारतात परतण्यास नकार दिला आहे. दरम्यान, खलाशांच्या आईने या प्रकरणी न्याय झाला असल्याचा दावा केला आहे.

कायदामंत्री अश्विनी कुमार यांनी इटली सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. इटालियन खलाशांना भारतात परतण्याची मुदत २२ मार्च रोजी संपत आहे. अश्विनी कुमार म्हणाले, इटलीच्या सरकराने त्यांच्या दोन्ही खलाशांना भारतात पाठवण्यास नकार देणे अयोग्य आहे. ते म्हणाले, या संदर्भात पंतप्रधानांनी संसदेत निवदेन केलेले आहे. अटॉर्नी जनरल जी.ई.वाहनवटी सोमवारी न्यायालयात सरकारची बाजू मांडणार आहेत.