आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटामध्ये राष्ट्रगीत वाजल्यावर उभे राहण्याची आवश्यकता नाही : सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चित्रपट अथवा माहितीपटात राष्ट्रगीत वाजत असेल तर लोकांना उभे राहण्याची आवश्यकता नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. न्या. दीपक मिश्रा व न्या. आर. भानुमती यांच्या पीठाने ३० नोव्हेंबरच्या निकालावर दाखल अनेक याचिकांवर एकाच वेळी सुनावणी केली. मागच्या निर्णयावर कोणतीही स्थगिती आणली जाणार नसल्याचे न्यायपीठाने स्पष्ट केले.  

चित्रपट पाहत असताना राष्ट्रगीत वाजत असेल तर लोकांनी उभे राहणे आवश्यक आहे की नाही, हे न्यायालयाने स्पष्ट करावे, अशी मागणी एका याचिकाकर्त्याने केली होती. असे असले तरी चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवण्याचा आदेश जैसे थे असून यादरम्यान पडद्यावर तिरंगाही दाखवला पाहिजे, हेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायपीठाने याचिकांवरील पुढील सुनावणी १८ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली.  

मंगळवारच्या सुनावणीत न्यायपीठ म्हणाले की, लोक या देशात राहत असतील तर राष्ट्रगीताचा अादर करणे त्यांची जबाबदारी आहे. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी राष्ट्रगीत सर्व शाळांसाठीही बंधनकारक करावयास हवे, अशी मागणी केली. देशभक्ती मुलांपासून रुजवली जावी, असे ते म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...