आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांवरील खटल्यांचा वर्षात निपटारा करा- सुप्रीम कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आमदार, खासदारांवरील गुन्हेगारी खटल्यांची सुनावणी वर्षभरात पूर्ण करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांना दिले आहेत. तपास संस्थेकडून आरोपपत्र दाखल केल्याच्या तारखेनंतर ही मुदत लागू असेल. वर्षभरात सुनावणी पूर्ण न झाल्यास संबंधित न्यायालयाला त्याचे कारणही विशद करावे लागेल. तसेच याचा अहवाल राज्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे सादर करावा लागेल, असे कोर्टाने स्पष्ट केले. ‘पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन’ या याचिकेवर न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांनी सोमवारी हा निकाल दिला. सद्य:स्थितीवर नाराजी व्यक्त करत लोढा म्हणाले की, वर्षानुवर्षे अशा खटल्यांची सुनावणी सुरूच राहते व आरोपी आमदार-खासदार म्हणून मिरवत राहतात.