आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court News In Marathi, Governmental Advertisment, Petition

सरकारी जाहिरातींच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारकडून आपल्या कामांचा पाढा वाचणा-या जाहिरातींचा सपाटाच लावला आहे. अशा जाहिरातींवर नियंत्रण आणण्यात यावे, अशी मागणी करणा-या जनहित याचिकेला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना याचिकेवर निवाडा शक्य नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.


सरन्यायाधीश पी. सत्यशिवम यांनी ही जनहित याचिका फेटाळून लावली. सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी सरकारच्या कामांचा गाजावाजासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. जनतेच्या तिजोरीची लूट करण्यात येत आहे, असा आरोप याचिकाकर्ते कोचुस्फी चित्तीपिल्लई यांनी केला आहे. तुमचे म्हणणे योग्य असले तरी याचिका दाखल करण्याची वेळ मात्र चुकीची निवडली. एवढ्या घाई-गडबडीत सुनावणी होणार नाही. निवडणुकीनंतर पुन्हा याचिका दाखल करता येऊ शकेल. तूर्त तरी याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही, असे सत्यशिवम यांनी सांगितले. दरम्यान, राजकीय पक्षाचे नाव, त्यांच्या नेत्याची छायाचित्रे सत्ताधारी सरकारच्या जाहिरातीवर प्रकाशित करण्यात येत आहेत, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता.