आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court News In Marathi, Life Imprisonment

फाशीला जन्मठेपेत बदलणारा निर्णय बेकायदेशीर - केंद्र सरकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंधरा आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ‘बेकायदेशीर’ असल्याचे केंद्राने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने 21 जानेवारीला हा निर्णय दिला होता. आरोपींनी दाखल केलेल्या दया याचिकेबाबतच्या निर्णयाला लागलेल्या विलंबामुळे फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. या निर्णयामुळे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना फाशीच्या शिक्षेतून सवलत मिळाली होती. त्यानंतर तामिळनाडू सरकारने या आरोपींची सुटका करण्याचेही आदेश देऊन टाकले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेवर स्थगिती आणली आहे.


संविधानाच्या कलम 145 नुसार या प्रकारच्या महत्त्वपूर्ण विषयासाठी पाच सदस्यीय पीठाने सुनावणी करायला हवी. त्यामुळे तीन सदस्यीय पीठाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेरील असल्याचेही केंद्राने म्हटले आहे.