आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court News In Marathi, Prashant Bhushan, Divya Marathi

सीबीआय पिंजर्‍यात : अभ्यागतांची नोंदणी पुस्तिका दिली कुणी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांच्या निवासस्थानी असलेली अभ्यागतांची नोंदणी पुस्तिका तुमच्याकडे सोपवली कुणी, अशी विचारणा करून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तीचे नाव बंद लिफाफ्यात सादर करण्याचे आदेश प्रशांत भूषण यांना सोमवारी दिले.

सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या वतीने भूषण यांनी दाखल केलेल्या यािचकेत सिन्हा यांनी टू-जी घोटाळ्यात आरोप असलेल्या अनेक लोकांची भेट घेतल्याचा आरोप केला आहे. यावर सोमवारी सिन्हा यांचे वकील विकास सिंह यांनी युिक्तवाद केला. यानंतर नोंदणी पुस्तिका सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती एल. एल. दत्तू यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.

ज्या लोकांनी सिन्ह यांच्या निवासस्थानी भेट दिली त्याची मािहती पडताळल्यानंतरच सिन्हा यांच्याविरुद्ध असलेल्या आरोपांबाबत विचार केला जाऊ शकेल, असे न्या. दत्तू म्हणाले. अ‍ॅड. विकास सिंह यांनी अ‍ॅड. भूषण यांनी न्यायालयात सादर केलेल्या नोंदणी पुस्तिकेच्या विश्वासार्हतेवरच शंका उपस्थित केली. काही लोक टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी दिशाहीन व्हावी म्हणून प्रयत्न करत असल्याचा आरोपही सिंह यांनी केला.

भूषण यांचा आरोप काय?
प्रशांत भूषण यांनी यािचकेत आरोप केला आहे की, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील अनेक आरोपींचे सिन्हा यांच्या निवासस्थानी जाणे-येणे होते. त्यांच्या नेहमी भेटी-गाठी होत. त्यामुळे टू-जी घोटाळ्याची चौकशी सिन्हा यांच्याकडून काढून घेण्यात यावी. यावर गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने सिन्हा यांना नोटीस बजावून शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. गेल्या शुक्रवारी सिन्हा यांनी शपथपत्र दाखल केले आहे.

अनेक बड्या व्यक्तींची नावे
टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील अनेक बड्या व्यक्तींची नावे भूषण यांनी यािचकेत नमूद केली आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्याची चौकशी करणारे सीबीआय संचालक रणजित सिन्हा अडचणीत आले असून अ‍ॅड. भूषण यांनी न्यायालयात सादर केलेली नोंदणी पुस्तिका, सर्वोच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तीचे नाव मागवून केलेली पडताळणी जुळली तर सिन्हांची आणखी अडचण होऊ शकते.