आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court News In Marathi, Prashant Bhushan, Divya Marathi

व्हिसल ब्लोअरचे नाव माहीत नाही,प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांच्या घरातील व्हिजिटर लिस्ट देणा-याचे नाव सांगू शकत नसल्याचा पवित्रा अॅड. प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात घेतला. सिन्हा यांच्यावर कोळसा आणि टूजी घोटाळ्यातील आरोपींची भेट घेतल्याचा आरोप आहे. प्रशांत भूषण सिन्हा यांच्या घरातील व्हिजिटर लिस्टच्या आधारे आरोप करणा-या दोन संघटनांची बाजू मांडत आहेत.

भूषण यांनी यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ते म्हणाले, व्हिजिटर लिस्ट उपलब्ध करणा-या व्यक्तीने आपले नाव सांिगतले जाऊ नये, अशी विनंती केली आहे. अशात त्याचे नाव जाहीर करणे विश्वासघात होईल. प्रतिज्ञापत्रात सत्येंद्र दुबे, अमित जेठवा यासारख्या आरटीआय कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. या सर्वांची नावे समोर आल्यानंतरच त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातही अनेक प्राण धोक्यात येऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाने सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि कॉमन कॉज नावाच्या संघटनांना गेल्या सुनावणीत निर्देश दिले होते. भेट देणा-यांचे नाव देण्याचे निर्देश देण्यात आले होते.