आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court News In Marathi, Shirdi Saibaba, Divya Marathi

साईंचा वाद सुप्रीम कोर्टात, शंकराचार्यांच्या वक्तव्यांना लगाम घालण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शिर्डीच्या साईबाबांशी निगडित वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. साईबाबांसंबंधी वक्तव्ये अवमानकारक असून, त्यावर बंदी घालावी, अशा मागणीची याचिका बुधवारी दाखल झाली. महाराष्ट्रातील साई मंदिरांची देखरेख करणाऱ्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने ही याचिका दाखल केली. यात शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती व त्यांच्या समर्थकांना साईंविरोधी वक्तव्ये करण्यास बंदी घालण्याची मागणी आहे.
तसेच या बाबतीत सरकारला निर्देश देण्यासही सांगितले आहे. शंकराचार्य व त्यांच्या समर्थकांना देशातील कोणत्याही मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणीही ट्रस्टच्या वतीने याचिकेत करण्यात आली आहे.

न्यायमूर्तींची माघार
सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती ए.आर. दवे व यू.यू. ललित यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीस अाली. मात्र, दवे यांनी त्यातून अंग काढून घेतले.