आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court News In Marathi, Sitting MPs, MLAs,

आमदार, खासदारांची सुनावणी एका वर्षात पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विद्यमान आमदार आणि खासदारांविरुद्ध आरोप निश्चित केल्यावर एका वर्षात सुनावणी पूर्ण करायला हवी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिला.
याबाबत न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या खंडपिठाने म्हटले, की विद्यमान आमदार आणि खासदारांविरुद्ध आरोप निश्चित केल्यानंतर एका वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे जर लोकप्रतिनिधी दोषी असतील तर त्यांना शिक्षा सुनावता येईल किंवा ते दोषी नसल्याचे घोषित करता येईल. जर एका वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण झाली नाही तर संबंधित न्यायालयाच्या न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना त्यामागचे नेमके कारण सांगणे आवश्यक आहे.
खंडपिठाने सांगितले आहे, की रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल्स अॅक्ट अंतर्गत ठेवण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात हा आदेश देण्यात आला आहे. राजकारणातून गुन्हेगारी कमी करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.