नवी दिल्ली- कर्नाटक राज्यातील बेळगाव जवळील येळ्ळूरमध्ये मराठी भाषीकांवर झालेला अमानुष लाठीचार्जची सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारपर्यंत नवी याचिका दाखल करून सोबत पुरावेही सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. यामुळे कर्नाटक पोलिसांना मराठी भाषिकांवरील लाठीचार्ज भोवण्याची शक्यता आहे.
येळ्ळूरमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. याबाबत राज्य सरकारने सहा आठवड्यात स्पष्टीकरण द्यावे, असेही सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे.
दरम्यान, येळ्ळूर येथे महाराष्ट्र राज्याच्या फलक पाडल्यावरून मागील रविवारी वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूर येथील महिला- पुरुषांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती. यात मराठी भाषीकांच्या घरांवर चिखल आणि दगडफेक केली होती. यात अनेक नागरीक जखमी झाले होते. यात दोन महिन्यांचे बालकाचा समावेश होता.