आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Of India Stays Hanging Of 8 Criminals

आठ दोषींच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हत्या व बलात्काराच्या वेगवेगळ्या प्रकरणांत आठ दोषींच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने एक महिन्याची स्थगिती दिली. राष्‍ट्रपतींनी त्यांच्या माफीचा अर्ज फेटाळला होता. संबंधित राज्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या असून चार आठवड्यांत त्यावर स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

शनिवारी उशिरा एका सेवाभावी संस्थेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले. माफीचे अर्ज फेटाळले गेल्याने या सर्वांना लवकरात लवकर फाशी दिली जाणार होती. त्यामुळे न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या निवासस्थानी विशेष सुनावणीत हे आदेश दिले. सुनावणीस झालेल्या विलंबाचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरला आहे.

6 कुटुंबांचा 8 जणांनी केला खात्मा : हरियाणाचे माजी आमदार रेलुराम पुनिया यांची मुलगी सोनिया व तिचा पती संजीव यांनी कुटुंबातील आठ जणांची हत्या केली होती. अन्य प्रकरणात अलाहाबादचा गुरुमितसिंग, उत्तर प्रदेशातील जफर अली, उत्तराखंडचा सुंदरसिंग, कर्नाटकमध्ये प्रवीण यांच्यासह कर्नाटकात सुरुंग स्फोटात 22 पोलिसांचे प्राण घेणाºया चौघांना अद्याप फाशी झालेली नाही.