आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर-बाबरी प्रकरणी तातडीने सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार, \'स्वामी मुख्य पक्षकार नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राम जन्मभूमी-बाबरी विध्वंस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. सुब्रमण्यम स्वामी हे काही मुख्य पक्षकार नसल्याचे कोर्ट म्हणाले. मागील सुनावणीवेळी कोर्टाने सर्व पक्षकारांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढला जाऊ शकतो का याची विचारणा केली होती. जर सर्वसंमतीने तोडगा निघत असेल तर कोर्ट यामध्ये मध्यस्थाची नेमणूक करेल. 
 
कोर्ट काय निर्णय घेऊ शकते? 
- सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका ठरवू शकते या प्रकरणी रोज सुनावणी शक्य आहे किंवा नाही.
- कोर्ट विचारू शकते की या प्रकरणी सर्व पक्षकारांचे एकमत झाले आहे का.
- या प्रकरणाशी संबंधीत इतरही पक्षकरा सुनावणीला हजर राहू शकतात आणि आपली बाजू मांडू शकतात.
बातम्या आणखी आहेत...