आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगनिदान: गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टला सुप्रीम कोर्टाने फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भ्रूण लिंगनिदानासंबंधी जाहिराती दाखवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सर्च इंजिन कंपन्या गुगल, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना जोरदार फटकारले आहे. हे लोक नफा कमावण्याच्या नादात भारतीय कायद्याचे महत्त्व ओळखत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तिन्ही सर्च इंजिन कंपन्यांनी तज्ज्ञांची समिती नेमून गर्भलिंग निदानासंबंधी आपत्तीजनक शब्द व त्यासंबंधीची माहिती ब्लॉक करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्या. आर. भानुमती यांच्या पीठाने हे निर्देश देताना यात काही शंका असतील तर एखाद्या संस्थेची मदत घ्यावी, असेही सुचवले आहे. अन्यथा पीएनडीटी कायदा कलम २२ नुसार कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला. 
 
बातम्या आणखी आहेत...