आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घोटाळा तपासात माजी सीबीआय संचालकांचे हात काळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांनी ‘कोल’गेट म्हणून चर्चेत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने ठेवला आहे. समितीने सिन्हांना प्रथमदर्शनी दोषी ठरवले आहे.

यूपीए सरकारच्या काळात झालेल्या या घोटाळ्याचा संथगतीने तपास केल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची चांगलीच कानउघाडणी केली सर्वोच्च न्यायालय कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या चौकशीवर देखरेख करत आहे. सीबीआयचे माजी विशेष संचालक एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रणजित सिन्हा यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवल्याचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले. सिन्हा यांनी घोटाळ्यातील काही हायप्रोफाइल आरोपींच्या भेटी घेऊन तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे रोहतगी म्हणाले. यानंतर न्यायमूर्ती मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. ए. के. सिक्री यांच्या न्यायपीठाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.
समितीचा निष्कर्ष : व्हिजिटर्स डायरी खरी
सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्या निवासस्थानची ‘व्हिजिटर्स डायरी’खरी असून या डायरीतील नोंदींची सत्यता पुराव्याआधारे न्यायालयातच तपासून पाहिली जाऊ शकते. पुरावा नसेल तर मात्र आम्ही या प्रकरणात पुढे जाऊ शकणार नाही, असे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सिन्हा यांचा दावा : नोंदी संशयास्पद.., महिनाभरात तपास पूर्ण करू असे नेहमी सांगता, पण पूर्ण का झाला नाही?.., एसआयटी स्थापून चौकशी करा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...