आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीश,नातलगांची एकाच कोर्टातील प्रॅक्टीस बंद करा; सुप्रीम कोर्टात याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यायाधीश, त्यांची मुले व नातेवाइकांनी एकाच न्यायालयात प्रॅक्टीस करणे हा एकप्रकारे भ्रष्टाचारच आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
यात याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयात न्यायाधीश व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रॅक्टीस करण्यास बंदी घालण्यात यावी. ज्यामुळे लोकांचा न्यायपालिकेवरील विश्वास कायम राहू शकेल. त्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत केंद्र सरकार तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाला प्रतिवादी करण्यात आले आहे. एम. एल. शर्मा नामक वकिलाने ही याचिका दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयानेच ठरवले होते निकष
सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये पूर्ण पीठाने एक सनद तयार केली होती. त्यात न्यायाधीश आपल्या न्यायालयात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व इतर जवळच्या नातेवाईकांना सादर होण्यास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट केले होते. या शिवाय न्यायाधीशांसमोर सुनावणीस येणार्‍या प्रकरणांमध्ये या लोकांची कोणतीच भूमिका असणार नाही, असेही यात नमूद करण्यात आले होते.