आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Quashes Stay Of Salman Khan\'s Conviction

काळवीट प्रकरण: सलमानला सुप्रीम कोर्टाचा धक्का, 4 वर्षांच्या शिक्षेवरील स्थगिती रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संग्रहित छायाचित्र)
नवी दिल्ली - प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून धक्का बसला आहे. राजस्थान हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. सलमानला व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने त्याला झालेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला विशेष सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सलमान खानने पुन्हा या प्रकरणी वरच्या कोर्टात दाद मागितली होती. पण त्याला झालेल्या पाच वर्षांच्या शिक्षेमुळे इंग्लंडचा व्हिसा मिळण्यात त्याला अडचणी येत होत्या. कारण इंग्लंडच्या व्हिसाच्या नियमानुसार चार वर्षे किंवा अधिक शिक्षा झालेल्यांना व्हिसा देण्यात येत नाही. त्यामुळे व्हिसा मिळण्यासाठी या शिक्षेवर स्थगिती देण्याची मागणी करत सलमानने हायकोर्टात दाद मागितली होती. त्याची मागणी मान्य करत हायकोर्टाने त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.
हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शिक्षेवरील स्थगिती रद्द केली आहे. पण इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासंदर्भात सलमानने हायकोर्टात आपली भूमिका मांडावी असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले.

इंग्लडला जाता येणार नाही
स्थगिती फेटाळली गेल्यामुळे आता, सलमान खानला इंग्लंडला जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार सलमानने यासंबंधी पुन्हा हायकोर्टात दाद मागितल्यानंतरच यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे सलमानच्या चित्रपटांचे शुटिंग रखडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढील स्लाइड्वर वाचा... इंग्लंडचा व्हिसा देण्यास नकार