आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रसह पाच राज्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राज्य अन्न आयोगाची नेमणूक न करणे वा तो कार्यान्वित न केल्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक या पाच राज्यांना बुधवारी फटकारले. 

याबाबत न्यायालयाने दहा राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटिस पाठवली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यान्वये राज्य अन्न आयोगाची नियुक्ती बंधनकारक असल्याचेही कोर्टाने बजावले अाहे. महाराष्ट्राचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल तुषार मेहता कोर्टात म्हणाले, आयोगाचे पाच सदस्य नेमले आहेत. मात्र दोन एससी-एसटी सदस्यांची नियुक्ती करायची आहे. त्यावर तुम्हाला अख्ख्या राज्यातून एससी-एसटी गटातील दोन माणसे मिळत नाही, असे म्हणत कोर्टाने पुन्हा झापले.
बातम्या आणखी आहेत...