आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्वासंबंधी 21 वर्षे जुन्या निकालावर फेरविचार नाही; मताच्या मुद्द्याचे पाहू : सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हिंदुत्वावर आपण दिलेल्या २१ वर्षे जुन्या निकालावर फेरविचार करणार नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर म्हणाले, ‘हिंदुत्व जीवनशैली आहे किंवा हिंदू धर्माचा भाग? यात जाण्याची इच्छा नाही. आम्ही राजकारणातील धर्माच्या वापरासंबंधी समोर आलेल्या खटल्याची सुनावणी करू.’ सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ दोन प्रकरणांची सुनावणी करत आहे.

धर्माच्या आधारे मते मागणे योग्य की अयोग्य, याचा निवाडा न्यायालयाला करायचा आहे. सदस्यीय पीठ म्हणाले, आमच्यासमोर धर्माच्या आधारे मत मागण्याचे प्रकरण आहे. त्यावर निकाल द्यायचा आहे. हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून चर्चा होईल. न्यायालयाने १९९५मध्ये यासंबंधी निकाल दिला होता.

निकालावर फेरविचार करावा लागेल या एका वकिलाच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश म्हणाले, सध्याच्या प्रकरणात या निकालाचे उदाहरण ठेवले जात असले तर आम्ही ऐकून घेऊ. मात्र, २१ वर्षे जुन्या प्रकरणावर फेरविचाराबाबत मात्र ऐकून घेतले जाणार नाही. तिस्ता सेटलवाड यांच्यातर्फे पक्षकार होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी हिंदुत्वाच्या निकालाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती. सर्वाेच्च न्यायालयाने या याचिका प्रलंबित ठेवल्या आहेत. घटना पीठाच्या अन्य सदस्यांमध्ये न्या. मदन बी. लोकूर, न्या. एस.ए.बोबडे, न्या. आदर्श कुमार गोयल, न्या. उदय यू ललित, न्या. धनंजय वाय. चंद्रचूड आणि न्या. एल.नागेश्वर राव यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...