आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK सुफी संताच्या व्हिसाला मुदतवाढ देण्यास SC चा नकार, 6 वर्षांपासून भारतात मुक्काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानच्या एका सुफी संताच्या व्हिसाची तारीख वाढवण्याची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटले, की हा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. सुफी संताला त्याच्या पत्नीसह आणखी काही दिवस भारतात राहायचे होते. मुंबई हायकोर्टाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यासा आधीच नकार दिला होता. त्यानंत त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. 
 
 ऑक्टोबर 2010 पासून होते भारतात 
 - जस्टिस दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पीठाने सुफी संत सैय्यद वसीम-उर-रहमान यांची याचीका फेटाळली आहे.
 - कोर्ट म्हणाले,'व्हिसाची मुदत वाढवण्याचा निर्णय सरकार घेईल. जर सरकार मुदत वाढवून देत नसेल तर आम्हीही ते करु शकत नाही.'
 - सुफी संत ऑक्टोबर 2010 मध्ये भारतात आले होते. तेव्हापासून ते भारतात आहेत.
 - मुंबईतील फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसरने त्यांच्या व्हिसा मुदतवाढीला नकार दिला होता. त्यांनतर त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका सादर केली होती. 
 - हायकोर्टाने त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते.
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...