आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Rejects Centre's Plea Opposing SIT On Black Money

ब्लॅक मनी : केंद्राची याचिका फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ब्लॅक मनीशी संबंधित सर्व प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याबाबत बजावलेला आदेश परत घेण्याच्या मागणीसाठी केंद्राने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. काळ्या पैशाची सहा दशकांपासूनची समस्या आहे. सरकारला विदेशातील बँकेत जमा काळा पैसा परत आणण्यात अपयश आल्याचे कारण देत याचिका फेटाळली.

देशातील नागरिक जे स्वप्न पाहतो आहे, त्याची पूर्तता एसआयटीतून होईल, असे न्या. एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय पीठाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

विदेशात दडलेला पैसा परत आणण्यात कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. हा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणता येऊ शकेल, असे न्यायालय म्हणाले.

काळा पैसा आणण्यासाठी प्रयत्नही झाले नाहीत तसेच तो दडवणार्‍या लोकांची नावेही जाहीर करण्यात आली नाहीत. हा पैसा परत आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दरडोई उत्पन्नात वाढ होईल. यामुळे 30 टक्के प्राप्तिकराचा दर कमी होईल, असे न्या. रंजना देसाई आणि न्या. मदन बी. लोकूर यांच्या पीठाने नमूद केले. सॉलिसिटर जनरल मोहन परसरन यांनी काळा पैसा परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाचे त्यावर समाधान झाले नाही.