आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Rejects Somnath Bharti\'s Bail Plea, Asks Him To Surrender Today

सोमनाथ भारतींचा जामीन अर्ज SCने फेटाळला, आजच समर्पणाचा आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) आमदार आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. भारती यांना आत्मसमर्पण करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. भारतींवर त्यांची पत्नी लिपिकाने कौटुंबिक छळ, मारहाण आणि अंगावर कुत्रा सोडल्याचा आरोप केला होता.
काय झाले कोर्टात
भारती यांचा जामीन अर्ज फेटाळताना कोर्टाने त्यांना आजच आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. आज सायंकाळी द्वारका पोलिस स्टेशनमध्ये भारती समर्पण करणार असल्याची माहिती आहे. दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर भारती फरार होते. दिल्ली पोलिसांनी आसपासच्या राज्यांमध्ये त्यांचा शोध घेतला होता. तेव्हा भारती यांनी एका चॅनलवर पोलिसांना आवाहन केले होते, की जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत नाही तोपर्यंत समोर येणार नाही.
सोमनाथ भारतींचे वकील काय म्हणाले
कोर्टाच्या आदेशावर भारतींचे वकील विजय अग्रवाल म्हणाले, 'कोर्टाने त्यांना आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. त्यांची भेट झाल्यानंतर मी त्यांना याबाबद माहिती देईल.'