आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Rejects Zaibunnisa Qazi\'s Petition

शरणागतीसाठी मुदतवाढः संजय दत्तच्‍या याचिकेवर सुनावणी उद्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी झैबुन्निसा काझीची शरणागतीसाठी मुदतवाढीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे तिला 18 एप्रिलला समर्पण करावे लागणार आहे. झैबुन्निसासह अब्दुल गफूर आणि इसाक हजवाणेचाही मुदतवाढीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे अभिनेता संजय दत्त याच्या समर्पण मुदतवाढीच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे. त्‍याच्‍या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलण्‍यात आली आहे. ही सु‍नावणी उद्या सकाळी होणार असून त्‍याला शिक्षा ठोठावणारे न्‍यायाधीश उद्या उपस्थित राहणार आहेत. संजय दत्तने 6 महिन्‍यांची मुदत मागितली आहे.

दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींकडून सुनावणी होत नाही, तोपर्यंत समर्पणाची मुदतवाढ मिळावी, अशी याचिका झैबुन्निसाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. परंतु, राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केला असताना समर्पणाची मुदत वाढवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी निर्णय देताना स्‍पष्‍ट केले. करताना म्हटलं.

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने झैबुन्निसा काझीला दोषी ठरवलं असून तिला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.