आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका, सर्व योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आधार कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यास सुप्रिम कोर्टाने नकार देत केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला झटका दिला आहे. न्यायालयाने सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची अवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

आधार कार्ड बंद करण्याची मागणी करणारी एका जनहित याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी कोर्टाने सरकारी गॅस कनेक्शनसारख्या सेवांकरीता आधार कार्ड गरजेचे नसल्याचे म्हटले आहे. गॅस कनेक्शनशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्यांचा समावेश यात करता येण्यासारखा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यासोबतच अवैध प्रवाशांना केल्या जाणा-या आधार कार्डचे वाटप थांबवण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.