आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैद्यांनाही मोकळ्या हवेत श्वास घेण्याचा, कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळावा - SC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे,  शिक्षेच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांनाही पॅरोल आणि फर्लो सारखी रजा मंजूर करुन मोकळ्या हवेत श्वास आणि कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. एका प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट म्हणाले, अशा प्रकारच्या प्रकरणांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. पॅरोल आणि फर्लो मंजूर करण्यासाठी 1955 च्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.  
 
शिक्षेचा अर्थ काय 
- 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील एका दोषीने पॅरोल आणि फर्लोची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हे टीप्पणी केली आहे. 
- या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे जस्टीस ए.के. सिकरी आणि जस्टिस अशोक भूषण यांच्या पिठाने केली. सरकारच्यावतीने सांगण्यात आले की पॅरोल आणि फर्लोचे नियम 1955 मध्ये तयार करण्यात आले होते. आता ते लागू होत नाही. 
- बेंचने म्हटले की शिक्षा भोगण्याचा एक अर्थ कैद्याच्या वर्तणात सुधार होणे आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करणे असाही आहे. 
 
सुप्रीम कोर्ट काय म्हणाले? 
- दोन न्यायाधीशांच्या पिठाने हे नियम त्वरीत बदलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच आमच्या निर्णयाची एक प्रत विधी आणि न्याय मंत्रालयाला पाठवण्यात यावी, असेही आदेश कोर्टाने दिले. 
- त्यासोबतच कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की ज्या व्यक्तीला जेवढ्या कालावधीची शिक्षा झाली आहे, तेवढा पूर्ण काळ तुरुंगात राहिले पाहिजे. 
- तुरुंगातून मिळणाऱ्या सुटीवर कोर्ट म्हणाले, कैद्याला तुरुंगातून काही काळासाठी सुटी यासाठी दिले जाते की त्याने कुटुंबाचे आणि वैयक्तिक काही समस्या असतील तर त्या सोडवाव्या आणि तो समाजाचा भाग राहिला पाहिजे. 
 
कोणत्या ग्राऊंडवर पॅरोल आणि फर्लो ?
- सुप्रीम कोर्ट म्हणाले, की पॅरोल आणि फर्लोचा सर्वात मोठा आधार आहे की कैदीचे समाज आणि कुटुंबासोबतचे नाते कायम राहिले पाहिजे. कारण शिक्षेचा अर्थ हा देखील आहे की तुरुंगात राहु त्याने नव्या आयुष्याचा विचार करावा. 
- पिठाने स्पष्ट केले की जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही काही काळासाठी पॅरोल आणि फर्लो दिले पाहिजे. यामुळे त्याचे कुटुंब आणि समाजासोबतचे नाते कायम राहिल. त्याचे वैयक्तिक किंवा कुटुंबाचे काही अडलेले काम असेल ते पूर्ण करता येईल. त्यांना देखील मोकळ्या हवेत श्वास घेता आला पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...