आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supreme Court Say Nudity Per Se Not Obscene Boris Becker And Barbara Feltus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्येक विवस्त्र छायाचित्र अश्लिल असू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रत्येक विवस्त्र छायाचित्र अश्लिल असू शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सांगितले. एखादे विवस्त्र छायाचित्र उत्तेजीत करणे, 'सेक्‍स' भावना भडकवण्याच्या उद्देशाने दिले नसेल तर त्याला अश्लिल म्हणता येणार नाही, असाही निर्वाळा न्यायमूर्ती के.एस.राधाकृष्णन् आणि ए.के.सिकरी यांच्या खंडपीठाने दिला.

कोलकाता हायकोर्टात टेनिस स्टार बोरिस बेकर आणि त्याची प्रेयसी बार्बराच्या छायाचित्राप्रकरणी झालेल्या सुनवाणीवरही सुप्रीम कोर्टाने यावेळी खंत व्यक्त केली. यापूर्वी 1986 मध्ये कोर्टाने 'अश्लिलता' या शब्दाची व्याख्या दिली होती. त्यानुसार, विवस्त्र छायाचित्राचा उद्देश्य जाणून न घेता तो अश्लील ठरविणे, तसेच त्याचा संबंध एखाद्या गुन्ह्याशी जोडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण...
1993 मध्ये एका जर्मन क्रीडा मासिकाने ब्रिटिश टेनिस खेळाडू बोरिस बेकर आणि त्याची अश्वेत प्रेयसी बार्बराचा विवस्त्र छायाचित्र प्रसिद्ध केले होते. बेकर आणि अंधारात उभी असलेल्या बार्बराच्या अंगावर वस्त्रे नव्हते. हे छायाचित्र बार्बराच्या वडिलांनी काढले होते. बोरिस हा कोणताही वर्णभेद मानत नाही. तसेच तो वर्णभेदाच्या विरोधात असल्याचे त्यांना यातून दाखवायचे होते.

हे छायाचित्र प्रसिद्ध करणार्‍या दोन स्‍थानिक प्रकाशकांविरोधात कोलकाता कोर्टात याचिका दाखल केली होती.
(फोटो- बोरिस बेकर आणि प्रेयसी बार्बराच्या या सेमी न्‍यूड छायाचित्रावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला.)