आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Says Minor Convict In Delhi Gangrape Case Can't Be Tried As Adult

‘अल्पवयीन’च्या नव्या व्याख्येस कोर्टाचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - क्रूर गुन्ह्यांमधील अल्पवयीनचे (जुवेनाइल) वय नव्याने ठरवण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. दिल्ली गँगरेप प्रकरणी अल्पवयीनावरील खटला नियमित कोर्टात चालवण्याची याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. क्रूर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनाचे वय निश्चितीचा मुद्दा न्याय मंडळाऐवजी नियमित कोर्टावर सोपवला.दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडितेचे कुटुंबीय व भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी जुवेवाइल जस्टीस अँक्ट 2000 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले होते.

सरन्यायाधीश पी. सदाशिवम, न्यायमूर्ती रंजन गोगोई व शिकीर्तीसिंह यांच्या पीठाने त्यावर सुनावणी करताना म्हटले की आरोपींवरील खटले जुवेनाइल जस्टिस कायद्यांतर्गत चालवण्यासाठी 18 वर्षे वय निश्चित करण्यात घटनात्मकदृष्ट्या अवैध काही नाही. केंद्र सरकारनेही या याचिकांना विरोध केला होता. 16 डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत सहा जणांनी 23 वर्षीय युवतीवर गँगरेप केला होता. त्यातील चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. एक आरोपी अल्ववयीन असल्याने त्याला फाशी होऊ शकली नाही.पीडित युवतीचा उपचारादरम्यान सिंगापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता.