आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supreme Court Slams Modi Government On Clean Ganga Project

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर 200 वर्षांत स्वच्छ होणार नाही गंगा, मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेल्या 'गंगा शुद्धीकरण' उपक्रमाबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी साशंकता व्यक्त केली आहे. या शतकात तरी गंगा नदी स्वच्छ होईल की नाही? असा सवालही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारसमोर उपस्थित केला.

मोदी सरकारने गंगा शुद्धीकरणासाठी एक अॅक्‍शन प्‍लान तयार केला आहे. परंतु या अॅक्शन प्लान पाहता पुढील 200 वर्षातही गंगा नदी स्वच्छ होणार नाही, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारचे कान उपटले आहे.

गंगा नदी कोणत्या पद्धतीने शुद्ध करणार आहे, याबाबत पुढील तीन आठवड्यांत मोदी सरकारने कोर्टात 'पॉवर पॉइंट'वर सविस्तर माहिती सादर करावी, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.

कोर्ट म्हणाले, मोदी सरकारचा अॅक्‍शन प्‍लान पाहून तर असे वाटते की, गंगा 200 वर्षांनंतरही स्वच्छ होणार नाही. गंगा शुद्धीकरणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे गंगा नदीला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पाऊले उचलायला हवी, अशी अपेक्षाही सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली आहे.