आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Slapped To The Union Governments Over The Coal Scam

कोळसा घोटाळा अहवालावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा घोटाळ्याच्या तपास अहवालात बदल केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सीबीआय आणि केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. या बदलांमुळे अहवालाचा गाभाच बदलला असल्याचे नमूद करून सीबीआय पाळीव पोपटासारखी मालकाचीच भाषा बोलत असल्याचे कोर्ट म्हणाले. वास्तविक सीबीआयने स्वायत्त संस्थेसारखे काम करायला हवे, असेही बजावले. न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बुधवारी यावर सुमारे 2 तास 10 मिनिटे सुनावणी केली. सीबीआयला स्वायत्तता देण्यासाठी सरकारने 10 जुलैपर्यंत कायद्यात बदल करावेत. अन्यथा सुप्रीम कोर्ट पुढाकार घेईल, असा इशाराही कोर्टाने दिला.


यामुळे मानहानी...- कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारने स्टेटस रिपोर्टमध्ये जे बदल केले त्यामुळे तपासाची मूळ दिशा आणि भावनाच बदलली.
- अ‍ॅटर्नी जनरल जी. वाहनवटी यांनी या बदलांसाठी कायदामंत्र्यांना जबाबदार ठरवले. ते म्हणाले, ‘अश्विनीकुमार यांच्या सांगण्यावरूनच मी सीबीआय अधिका-यांना भेटलो.’
- सीबीआयला स्वायत्तता देण्यासाठी काय प्रयत्न केले, अशी विचारणा कोर्टाने केंद्राला केली.


कोर्टाचा इशारा- सीबीआयला स्वायत्तता दिली नाही तर सुप्रीम कोर्ट पावले उचलेल. - सीबीआयने केवळ गुन्हा दाखल केला, तपास सुरूच करू शकली नाही. आता 10 जुलै रोजी सुनावणी