आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाराश्रींचा पॅरोल रद्द, \'आधी तुरुंगात या, काय करायचे आम्हाला सांगू नका\'; SC ने फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टानेे पुन्हा एकदा जबरदस्त झटका दिला आहे. रॉय यांना पॅरोल रजा वाढवून देण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट नकार दिला. त्याचप्रमाणेे रॉय यांना दिलेेली रजा तातडीने रद्द करण्यात आहे. रॉय यांनी तिहार तुरुंगात परतावे, असे आदेश कोर्टाने दिले आहे.

दरम्यान, आईच्या निधनामुळे यावर्षी मे मध्ये सुब्रतो रॉय यांना सशर्त पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
सुप्रीम कोर्टाने सहाराश्रींना फटकारले...
'तुम्हाला सुनावणी घ्यायची असेल तर तुरुंगात यावे लागले. काय करायचे हे आम्हाला सांगू नका. आरोपीला तातडीने कोठडीत घ्या', अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना फटकारले आहे.

मागील सुनावणीत 352 कोटी रुपये डिपॉझिट करण्याच्या अटीवर रॉय यांची पॅरोल 23 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. कोर्टाने रॉय यांच्या पॅरोल रद्द केल्याने आता त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.

कोर्टानेे विचारले- इन्व्हेस्टर्सच्या पैशाचे काय?
- सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठात सुब्रतो रॉय यांचा पॅरोल वाढवून देण्याच्या मागणीवर सुनावणी झाली.
- सहारा समुहाची संपत्ती विक्री करण्यास सुप्रीम कोर्टाने सेबीला परवानगी दिली.
- सुब्रतो रॉय यांचे वकील राजीव धवन यांनी कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. अशा पद्धतीने परवानगी देणे पक्षपातीपणाचे असल्याचा युक्तिवाद धवन यांनी कोर्टात केला.
- सुब्रतो रॉय यांनी सेबीकडे आणखी 300 कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आणि पॅरोल वाढवून मिळावा, अशी मागणी केली.
- पण कोर्टाने मागणी फेेटाळत सुुब्रतो यांचा पॅरोल रद्द करून तुरुंंगात परतायला सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, 4 मे 2014 पासून सुब्रतो तुरुंगात...
बातम्या आणखी आहेत...