नवी दिल्ली - भारतीय मच्छीमारांचा मारेकरी इटालियन नौसैनिक मसिमिलियानो लातोरने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत सुटी वाढवण्याची मागणी केली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये इटलीमध्ये त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. न्या. ए. आर. दवे आणि कुरियन
जोसेफ यांचे पीठ ९ एप्रिल रोजी अर्जावर सुनावणी करणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान इटालियन नौसैनिकांना सुटी दिल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली होती. मात्र, या वर्षी १४ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने लतोरेची सुटी तीन महिन्यांनी वाढवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने त्यावर कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. इटालियन राजदूतांनी १२ डिसेंबर २०१४ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासारखेच प्रतिज्ञापत्र द्यावे, असे न्यायालयाने म्हटले होते.