आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court To Review EPA's Mercury Emissions Rules

अ‍ॅसिड विक्रीच्या संपूर्ण बंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने अ‍ॅसिड हल्ले झालेल्या पीडित महिलांबद्दल सहानुभूती व्यक्त केली, परंतु तरीही त्याच्या विक्रीवर संपूर्णपणे बंदी घालता येणार नाही. जर एखाद्याने हल्ल्यासाठी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चाकू, रेझर अथवा अन्य वस्तूंचा वापर केला तर त्याच्या विक्रीवरही बंदी घालायची का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. अ‍ॅसिड हल्ल्यांसंदर्भात एका पीडित युवतीने याचिका दाखल केली होती. तिने अ‍ॅसिड विक्रीवर बंदीची मागणी केली होती. न्यायालयाने या युवतीप्रती पूर्ण सहानुभूती आहे. परंतु तिची अ‍ॅसिड विक्री थांबवण्याची मागणी मान्य करता येणार नसल्याचे म्हटले.

अ‍ॅसिड हल्ल्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्याच्या विक्रीबाबत याआधीच दिशानिर्देश जारी केले आहेत. सोनाली मुखर्जी यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याशिवाय अ‍ॅसिड हल्ल्याची आणखी एक पीडित महिला लक्ष्मीच्या वतीने दाखल करण्यात आलेली मुख्य याचिकादेखील सोनाली मुखर्जींच्या याचिकेसोबतच सुनावणीस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकारसह सर्व राज्यांना नोटीस बजावली आहे.