आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात सुशिक्षितच होऊ शकतील सरपंच, कायदा दुरुस्तीवर कोर्टाची मोहोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हरियाणात आता साक्षरांनाच पंचायत निवडणुका लढवता येतील. हरियाला सरकारला दिलासा देत सर्वाच्च न्यायालयाने पंचायत राज कायदा दुरुस्तीस वैध ठरवले आहे. किमान शैक्षणिक पात्रतेसह घरात शौचालय असणे, एखाद्या प्रकरणात दोषी नसणे, वीज बिलाची थकबाकी नसणे या अटीही लागू झाल्या आहेत.

कोर्ट म्हणाले, पंचायत राजसंबंधित नवा कायदा घटनात्मकरीत्या वैध आहे. नव्या कायद्यामुळे निवडणुका लढवण्याच्या लोकांच्या घटनात्मक हक्कांवर गदा येईल, असे म्हणून तो अवैध ठरवला जाऊ शकत नाही. विधिमंडळाला कायदे करण्याचा हक्क आहे आणि राज्य सरकारने तो बजावला आहे. याच अधिकारान्वये कायदा केला आहे. दोन्ही न्यायमूर्तींनी स्वतंत्र पण सहमतीने निकाल सुनावला.
अशी पात्रता
{ दहावी उत्तीर्ण : खुल्या गटातील उमेदवारांसाठी
{ आठवी उत्तीर्ण : दलित
आणि महिलांसाठी
बातम्या आणखी आहेत...