आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाची ताकीद; याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाची ताकीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एका खटल्याची सुनावणी चालू असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी फिर्यादीने कोणत्याही न्यायालयात याचिका दाखल न करण्याचे अाश्वासन घेतले. त्याचबरोबर याचिका दाखल केल्यास तुरुंगात पाठवू, अशी सक्त ताकीदही दिली. फिर्यादीने याचना करत यापुढे याचिका दाखल करणार नसल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर त्याला ५ लाखांचा दंड माफ केला.  


हा घटनाक्रम न्या. मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या न्यायालयात घडला. मुझफ्फरनगर येथील उमेदअली त्यागी यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या वादातून अलाहाबाद उच्च न्यायालयात एका पाठोपाठ एक अशा १६ याचिका दाखल केल्या होत्या. उच्च न्यायालयाने गेल्या ४ जुलै रोजी त्याला अवमानना प्रकरणी दोषी ठरवून ५ लाखांचा दंड ठोठावला. न्यायालयाचा वेळ वाया घातला व याचिका प्रक्रियेचा दुरुपयोगही केला, असे न्यायालयाने म्हटले होते.  


त्यागी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान न्या. लोकूर म्हणाले, काही लोकांना  वारंवार याचिका दाखल करून त्यांचे म्हणणे ऐकले जाईल, असे वाटते.  पण तसे काही नसते. हा न्यायालयाचा अवमान आहे. कायदेशीर प्रक्रियेचा दुरूपयोग आहे. या खटल्यात याचिकाकर्त्याने चूक मान्य केल्यामुळे त्याला दंड माफ करतो. बँकेच्या वादाशी संबंधित  याचिका दाखल करणार नाही असे न्यायालयाने लेखी लिहून घेतले. 

बातम्या आणखी आहेत...