आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही नाही उडणार शर्यतीचा धुराळा; बंदी कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्‍यानंतर सर्वत्र आनंदाला उधाण आले होते. मात्र, हा आंनद क्षणिक ठरला. कारण सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरची बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाही शंकरपटासाठी राजा-सर्जाला जुंपल्‍या जाणार नाही नि शर्यतीचा धुराळा उडणार नाही.

शर्यती पुन्‍हा सुरू व्‍हाव्‍या यासाठी पुढाकार घेणा-या भाजपा नेत्‍यांसाठी मात्र हा निर्णय निराशाजनक मानला जात आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शंकरपटातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्‍यातील शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर पुढाकार घेणा-या नेत्‍यांच्‍या पदरी निराशा पडली आहे.
प्राणीमित्र संघटनांनी केले होते आरोप....
- बैलगाडी शर्यतीप्रमाणे तामिळनाडूतील जलिकट्टू प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
- जलिकट्टूमध्ये बैलांना दारू पाजून, त्यांना मारहाण केली जाते, असा आरोप प्राणीमित्र संघटनांचा आहे.
- या खेळात पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखले जाते.
- बैलगाडी शर्यतींमध्येही बैलांना मारहाण होत असल्याचा आरोप आहे.
- तातडीचा विषय म्हणून या प्रकरणावर सुनावणी करण्याची विनंती प्राणीमित्र संघटनांची केली होती. ही विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य केली.
पुढील स्‍लाइडवर वाचा काय आहेत, पर्यावरण मंत्रालयाच्‍या सूचना...