आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्याने नीट घेण्याच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-  एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी म्हणजेच नीट नव्याने घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर लगेच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
 
न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. नवीन सिन्हा यांच्या सुटीतील खंडपीठापुढे गुरुवारी ही याचिका सादर करण्यात आली. नीट परीक्षेचा पेपर बिहारमध्ये फुटला आणि राजस्थान व पश्चिम बंगालसारख्या राज्यांतही हा फुटलेला पेपर वाटण्यात आला, असा आरोप करत नीट परीक्षा नव्याने घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. नीटच्या निकालावरही स्थगितीची मागणी याचिकेत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...