आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया म्हणाल्या- आम्हाला ‘पप्पू’ समजू नका, आम्ही मराठे घाबरत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रिया सुळे - Divya Marathi
सुप्रिया सुळे
नवी दिल्ली - सोमय्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आम्हा सगळ्यांना तुरुंगात डांबले तरी आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाहीत. आम्ही मराठे आहोत; कधीच डगमगत नाही. सोमय्यासारखी क्षुल्लक व्यक्ती टीका करीत सुटते आणि प्रसारमाध्यमे त्यांना उचलून धरतात. टीका करणारी व्यक्तीही भारदस्त असावी. प्रसारमाध्यमांशी आम्ही सुसंवाद ठेवताे याचा अर्थ त्यांनी आम्हाला ‘पप्पू’ समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड आदर आहे.’
काय म्हणाले होते सोमय्या
‘भुजबळ यांच्यापाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे यांना तुरुंगात जावे लागेल,’ या खासदार किरीट सोमय्यांच्या प्रतिक्रियेवर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारलाच आव्हान दिले आहे.
सुळे म्हणाल्या - आम्ही मराठे डगमगत नाही
‘सगळ्यांना तुरुंगात डांबले तरी आम्ही घाबरणारे नाहीत, मराठे आहोत! डगमगत नाही, शांत बसणार नाही आमचा आवाजही काेणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली किंवा नाही हे नंतर स्पष्ट होईल, परंतु संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे’, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता
भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक झाल्यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, ‘छगन भुजबळ हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी उभी नाही असे म्हणणे अनुचित आहे. जितेंद्र आव्हाड, संजय दिना पाटील आदी पक्षाचे नेते सातत्याने त्यांच्यासोबत दिसत होते. आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत.’
पुढील स्लाइडमध्ये, भुजबळ जेव्हा न्यायमुर्तींना म्हणतात, ‘अध्यक्ष महोदय’
बातम्या आणखी आहेत...