आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCPच्या सुप्रिया सुळे वाटतात गोळ्या, विरोधी पक्षांचे खासदार खाऊन करतात गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली तेव्हापासून लोकसभेत गोंधळ सुरु आहे. विरोधीपक्षाच्या खासदारांनी सलग एक दिवसही कामकाज चालू दिलेले नाही. आरडाओरड करुन ते कामकाज बंद पाडत आहेत. कदाचित त्यामुळे त्यांच्या घशाला त्रास जाणवत असावा. असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्र बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या लोकसभेत काही दिवसांपासून खासदारांना गोळ्या वाटत आहेत. त्या खाऊन विरोधी पक्षाचे खासदार पुन्हा घोषणाबाजी आणि आरडाओरड करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे सभागृहात येताना रोज गोळ्यांची काही पाकिटे सोबत घेऊन येतात आणि काही सदस्यांना देत असतात.
का सुरु आहे गोंधळ
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीची मदत केल्या प्रकरणी काँग्रेससह विरोधीपक्षांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापमं घोटाळ्याचा आरोप झालेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दोन आठवड्यांपासून सभागृहाचे कामकाज सुरु झाल्याबरोबर काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे खासदार राजीनाम्यावरुन गदारोळ करत आहेत.
याशिवाय जातिआधारित जनगणनेचे आकडे जाहीर करण्याची विरोधकांची मागणी आहे. यामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन गोंधळात वाहून चालले आहे.
बातम्या आणखी आहेत...