आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींची चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाळा प्रकरणी आयोजन समितीचे बडतर्फ अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची सीबीआयने गुरुवारी तीन तास चौकशी केली.

कलमाडी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. मॉरीशसच्या ईकेएस कंपनीला चुकीच्या पद्धतीने तीन कंत्राट दिल्याप्रकरणी सीबीआयने कलमाडी यांची चौकशी केली. ही कंत्राटे सुमारे 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची होती. आॅक्टोबर 2010 मध्ये पार पडलेल्या या आयोजनासाठी या कंपनीने स्थळे सुचवणे, संपूर्ण व्यवस्थापन करणे तसेच विविध कामे करणाºया कामगारांबाबत एक योजना आखणे अपेक्षित होते. राष्ट्रकुल घोटाळ्याची चौकशी केलेल्या शुंगलू समितीने या कंपनीला कामाचे कंत्राट देणे म्हणजे गुणवत्तेची चेष्टा करणे म्हटले होते. अंमलबजावणी संचालनालयही या प्रकरणाची चौकशी करत आहे.