आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Kalmadi Loses Sian Athletics Association Elections

सुरेश कलमाडींचा पराभव, आशियाई अ‍ॅथलेटिक्‍सच्या अध्यक्षपदी दहलान हमाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याचे मुख्य आरोपी सुरेश कलमाडी यांचा आशियाई अ‍ॅथलेटिक्‍स संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.

कतारच्या दहलान जुमान अल हमाद यांनी कलमाडींचा दोन मतांनी पराभव केला. आशियाई अ‍ॅथलेटिक्सच्या 45 सदस्यांपैंकी 20 मते अल हमाद यांना तर कलमाडींना18 मते मिळाली. 45 मतांपैकी सात मते अवैध ठरविण्यात आली. हमीद हे याआधी संघटनेचे उपाध्यक्ष होते.

पुण्यात झालेल्या या निवडणूकीमुळे कलमाडींना घरच्याच मैदानावर पराभव स्विकारावा लागला आहे. 2000 पासून कलमाडी संघटनेच्या अध्यक्षपदावर होते. गेल्या दोन वेळी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपात कलमाडींना 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. या आरोपात त्यांनी दहा महिन्याचा तुरुंगवासही भोगला आहे. जामीनावर ते बाहेर आहेत.