आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेश प्रभूही वाढवू शकले नाही रेल्वेचे उत्पन्न, यंदा ३२ अब्ज रुपयांची तूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोट्यात चालणाऱ्या रेल्वेला प्रभूही वाचवू शकलेले नाही. तोट्यातील रेल्वे ते नफ्यात आणतील यासाठी शिवसेनेचा रोष पत्करुन मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले होते. - Divya Marathi
तोट्यात चालणाऱ्या रेल्वेला प्रभूही वाचवू शकलेले नाही. तोट्यातील रेल्वे ते नफ्यात आणतील यासाठी शिवसेनेचा रोष पत्करुन मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले होते.
नवी दिल्ली - रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या लाख प्रयत्नानंतरही रेल्वेच्या उत्पन्नामध्ये यंदा घट झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबरपर्यंत रेल्वेच्या महसूलात ३२ अब्ज ९ कोटी रुपयांची तूट झाली आहे. आकड्यामध्ये बोलायचे झाल्यास महसूलात ४.०४% तूट झाली आहे.

रेल्वे राज्यमंत्री राजन गोहाईं यांनी सांगितले की २०१५-१६ मध्ये रेल्वेचे सकल उत्पन्न 79,475 कोटी रुपये होते, ज्यात २०१६-१७ मध्ये तूट झाली आणि 76,266 कोटींवर येऊन थांबले.
- रेल्वेच्या महसूलातील तुटीचे प्रमुख कारण मालवाहतूक भाड्यात झालेली कमी. २०१५-१६ मध्ये १५ सप्टेंबरपर्यंत मालवाहतूक भाड्यातून रेल्वेला 52,771 कोटी रुपये उत्पन्न झाले होते.
- २०१६-१७ मध्ये १६ सप्टेंबरपर्यंत त्यात घट झाला असून 47,974 कोटी रुपये कमाई झाली आहे. याचा अर्थ माल वाहतूक भाड्यात या वर्षी 9.09% घट झाला आहे.
- मंत्री म्हणाले, गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा रेल्वेची ८.६७ मिलिटन टन मालवाहतूक कमी झाली आहे.
- देशात रोजगार निर्मीतीत क्रमांक दोनवर असणाऱ्या रेल्वेसाठी हा मोठा तोटा मानला जात आहे.

७८७ कोटी तोट्यासह टॉपवर आहे दक्षिण मध्य रेल्वे
- रेल्वेच्या उत्पन्नाची विभागवार तुलना केली तर, मध्य, पूर्व मध्य, उत्तर मध्य, पूर्वोत्तर, उत्तर पश्चिम, दक्षिण, दक्षिण पूर्व मध्य, दक्षिण पश्चिम, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे विभाग तोट्यात आहेत.
- यंदा सर्वाधिक तोटा पश्चिम विभागाला झाला आहे.
- दक्षिण मध्य रेल्वे विभाग ७८७ कोटी तोट्यासह टॉपवर आहे. तर, ७६२ कोटींच्या तोट्यासह पश्चिम विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पुढील स्लाइडमध्ये, पहिली हमसफर रेल्वे आजपासून सुरू, मोदी दाखवणार झेंडा
बातम्या आणखी आहेत...