आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्‍वेमंत्री प्रभू यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव; मोदी म्हणाले, ‘थोडी वाट पाहा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
#सुरेशप्रभूइस्तिफादो या हॅशटॅगने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. - Divya Marathi
#सुरेशप्रभूइस्तिफादो या हॅशटॅगने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली - मुजफ्फरनगरमध्ये २३ प्रवाशांचा अपघाती मृत्यू व बुधवारी अाैरय्यामध्ये डम्परवर एक्स्प्रेस धडकून १०० प्रवासी जखमी झाल्याची घटना अशा चार दिवसांत दोन रेल्वे अपघातांनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. मात्र, नंतर ट्विट करून नमूद केले की, ‘नैतिक जबाबदारी म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. परंतु त्यांनी थोडी वाट पाहा, असे सांगितले.’

चेअरमनचा राजीनामा
रेल्वे बोर्डाचे चेअरमन ए. के. मित्तल यांनीही अपघातांची जबाबदारी स्वीकारून प्रभूंकडे राजीनामा दिला. त्यांच्या जागी एअर इंडियाचे चेअरमन आणि एमडी अश्विनी लोहानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गडकरी नवे रेल्वेमंत्री?
सूत्रांनुसार, सुरेश प्रभूंनी अपघातांमुळे राजीनामा दिला ही लोकांची धारणा होऊ नये म्हणून थोडा वेळ दिला जाईल. त्यानंतर परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपवले जाऊ शकते.

१०१८ दिवस प्रभू यांचा रेल्वेमंत्रिपदाचा कार्यकाळ
३२४ जणांचा तब्बल २४ अपघातांत यादरम्यान मृत्यू
१००० हून अधिक प्रवासी जखमी झाले
 
बातम्या आणखी आहेत...