आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina Pre Wedding Party With Friends In Delhi

दिल्लीत रंगली सुरेश रैनाची Bachelors party, मित्रांनी शेअर केले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आज (3 एप्रिल) क्रिकेटर सुरेश रैनाचा त्याची बालपणीची मैत्रिण प्रियंकासोबत दिल्लीत विवाह होणार आहे. लग्नाआधी रैनाने दिल्लीत बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सुरेश रैनाचे जवळचे मित्र-मैत्रिण सहभागी झाले होते. रैनाच्या मित्रांनी सोशल मीडियावर पार्टीचे फोटो अपलोड केले आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर बोहेमिया देखील पार्टीला उपस्थित होता. दिल्लीतील जनपथ येथील लुटियन्स कॉकटेल हाऊस येथे ही रंगारंग पार्टी झाली.
पार्टीत सिंगर बोहेमिया आणि अखिल सचदेवा यांनी परफॉर्म केले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे साखरपुडा झाल्यानंतर त्याच दिवशी रैना दिल्लीला रवाना झाला आणि दिल्लीत उशिरा रात्रीपर्यंत पार्टी रंगली होती.
रैनाचा विवाह शुक्रवारी दिल्लीतील चाणक्यपुरी भागातील लीला पॅलेस हॉटेल येथे होणार आहे. रैनाने दिल्लीत लग्नासाठीची खरेदी केली. लीला पॅलेस येथे होणार्‍या विवाहाला 300 पेक्षा जास्त व्हिव्हिआयपींना निमंत्रण देण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह टीमचे सर्व सदस्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यासोबतच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, नवज्योतसिंग सिद्धू, कपील देव, रवी शास्त्री, सौरभ गांगुली या टीम इंडियाच्या माजी स्टार्सलाही निमंत्रित करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रैनाच्या प्री वेडिंग बॅशचे PHOTOS...