आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina Said He Had Not Done Anything Wrong

मी प्रामाणिक, क्रिकेटच माझे जीवन; मोदींच्या आरोपानंतर रैनाचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी यांनी लावलेले क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया क्रिकेटपटू सुरेश रैनाने दिली आहे.

रैना म्हणाला, "कोणत्याही फिक्सरशी माझे संबंध नाहीत. क्रिकेटच माझे जीवन आणि माझे वेड आहे. मी क्रिकेटबद्दल पूर्ण प्रामाणिक आहे.' ललित मोदी यांनी लावलेल्या आरोपावर रैना उत्तर देत होता. मोदी यांनी रैनाचे मॅच फिक्सरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. ललित मोदींनी रैनाशिवाय रवींद्र जडेजावरसुद्धा मॅच फिक्सरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र, जडेजाने यावर अद्याप खुलासा केलेला नाही.

रैनाने प्रथमच फिक्सिंगच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. रैनाने स्पोर्ट्स मॅनेजमेंट फर्म रिती स्पोर्ट्सकडून जाहीर एका प्रसिद्धिपत्रकात ही माहिती दिली. रैना म्हणाला, "काही दिवसांपूर्वी मीडियामध्ये माझ्याबद्दल जे काही सांगण्यात आले आहे त्याबद्दल मी माझ्या जगभरातील चाहत्यांना स्पष्ट करू इच्छितो की, मी कधीही खेळाशी बेइमानी केलेली नाही. मी कधीही खेळाच्या विरुद्ध पाऊल उचललेले नाही. मी पूर्ण प्रामाणिकपणे खेळतो.'

रैना पुढे म्हणाला, "क्रिकेटच माझे जीवन आणि क्रिकेटचेच मला वेड आहे. आता मी माझ्या कायदेशीर अधिकारांचीही समीक्षा करणार आहे. यानंतर मी न्यायालयात जाईन.'

काय होते प्रकरण
आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी आरोप करताना सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडीजचा डेवेन स्मिथ (तिघे चेन्नई सुपरकिंग्ज) या तिघांनी एका रिअल इस्टेटशी संबंधित व्यक्तीकडून लाच घेतल्याचे म्हटले होते. मोदींनी ट्विटरवर दावा करताना सांगितले की, संबंधित प्रकरणाबाबत त्यांनी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना जून २०१३ मध्ये पत्रही लिहिले होते.

आयसीसीचे स्पष्टीकरण
या तिन्ही खेळाडूंविरुद्ध पुरावे मिळाले नसल्याने क्लीन चिट दिली. आयसीसीने क्लीन चिट दिल्याने बीसीसीआयनेही या तिघांना निर्दोष ठरवत कारवाई केली नाही.