आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपटू सुरेश रैना प्रियंकाच्या विवाहबंधनात; धोनी, CM अखिलेशसह VVIP पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना शुक्रवारी प्रियंका चौधरीच्या विवाहबंधनात अडकला. या विवाह सोहळ्याला एन. श्रीनिवासन, चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग उपस्थित झाले होते. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहकुुटुंब सहभागी झाला होता.
अॅरेंज मॅरेज
हे लग्न लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असल्याचे खुद्द रैनाने म्हटले आहे. प्रियंकासोबत त्याची पहिल्यांदा 2008 मध्ये दिल्ली एअरपोर्टवर भेट झाली होती. प्रियंका ही रैनाच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे. रैना विश्वचषक खेळण्यासाठी गेला होता तेव्हाच त्याची आई आणि प्रियंकाच्या आईने विवाहाची संपूर्ण बोलणी पक्की केली होती.
IPL नंतर मधुचंद्र
विवाह झाल्यानंतर सुरेश रैना लगेच आयपीएल-8 मध्ये खेळणार आहे. त्यामुळे सुरेश रैनाला हनीमूनचा प्रोग्राम पुढे ढकलावा लागला आहे. रैना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत असून पहिली लढत 9 एप्रिलला आहे. आयपीएलनंतर रैना आणि प्रियंका मिलान (इटली) येथे हनीमूनसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अनेक वर्षानंतर 2008 साली अचानक भेट
सुरेश रैना आणि प्रियंकाबद्दल जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा रैनाने लग्नाच्या काही तास आधी पूर्ण केली. त्याने लग्नाबद्दल सांगितले की, प्रियंका माझी लहानपणाची मैत्रिण आहे. असे असले तरी मधल्या काळात अनेक वर्षे ते दोघे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. प्रियंकाला मी अनेक वर्षापासून ओळखत होतो. मात्र वयाच्या 10-12 वर्षानंतर आमचा मार्ग बदलला. त्यामुळे संपर्क नव्हता. मात्र, 2008 साली अचानक प्रियंका आणि मी दिल्ली एअरपोर्टवर भेटलो. प्रियंका हालँड (जेथे ती बॅंकर म्हणून काम करीत आहे)ला चालली होती तर मी आयपीएलसाठी बंगळुरूला चाललो होतो. एअरपोर्टवर फक्त पाच मिनिटांसाठी आमची भेट झाली. त्याआधी मी तिला लहानपणीच भेटलो होतो.
रैना म्हणाला, ‘गाजियाबादमध्ये प्रियंकाचे वडिल माझे स्पोर्ट्स शिक्षक होते. माझी आई आणि प्रियंकाची आई चांगल्या मैत्रिण आहेत. आमचे कुटुंबिया एकमेंकाना फार वर्षापासून ओळखत आहेत. त्यामुळे हे लग्न एक टिपीकल अॅरेंज मॅरेज आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रैनाच्या विवाहाला कोण-कोण पोहोचले