आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina To Tie The Knot With Childhood Friend Priyanka Chowdhary Today

स्टार क्रिकेटर सुरेश रैनाने सांगितली प्रियंकासोबतची आपली \'प्रेमकहाणी\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्टार क्रिकेटर सुरेश रैना शुक्रवारी विवाहबंधनात अडकला. रैनाने अखेर प्रियंका चौधरी या बॅंकर युवतीच्या गळ्यात माळ घातली. सुरेश रैनाच्या लग्नानंतर विशेषत युवतींना त्याच्या प्रेम कहाणीबाबत जोरदार उत्सुकता आहे. अशावेळी रैनाने आपल्या भावी पत्नीबाबत व लग्नाच्या घडामोडींबाबत स्व:तहून माहिती दिली. बालपणीची मैत्रिण प्रियंकाची अनेक वर्षानंतर दिल्ली एयरपोर्टवर केवळ 5 मिनिटांसाठी कशी योगायोगाने भेट झाली होती याची माहिती दिली.
अनेक वर्षानंतर 2008 साली अचानक भेट-
सुरेश रैनाने सांगितले की, प्रियंका माझी लहानपणाची मैत्रिण आहे. असे असले तरी मधल्या काळात अनेक वर्षे ते दोघे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. प्रियंकाला मी अनेक वर्षापासून ओळखत आहे. मात्र वयाच्या 10-12 वर्षानंतर आमचा मार्ग बदलला. त्यामुळे संपर्क नव्हता. मात्र, 2008 साली अचानक एके दिवशी प्रियंका आणि मी दिल्ली एयरपोर्टवर भेटलो. प्रियंका हालँड (जेथे ती बॅंकर म्हणून काम करीत आहे)ला चालली होती तर मी आयपीएलसाठी बंगळुरूला चाललो होतो. एयरपोर्टवर फक्त पाच मिनिटांसाठी आमची भेट झाली. त्याआधी मी तिला लहानपणीच भेटलो होतो.
रैना म्हणाला, ‘गाजियाबादमध्ये प्रियंकाचे वडिल माझे स्पोर्ट्स शिक्षक होते. माझी आई आणि प्रियंकाची आई चांगल्या मैत्रिण आहेत. आमचे परिवार एकमेंकाना फार वर्षापासून ओळखत आहेत. त्यामुळे हे लग्न एक टिपीकल अॅरेंज मॅरेज आहे.
पुढे आणखी वाचा, रैनाने काय काय गोष्टी सांगितल्या प्रियंकाबाबत व लग्नानंतर काय त्याचे नियोजन...