आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina To Tie The Knot With Childhood Friend Priyanka Chowdhary Today News In Marathi

सुरेश रैनाच्या विवाह सोहळ्यात 350 VVIP, हनीमून मात्र \'आयपीएल\'नंतरच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना आज लग्नाच्या बेडीत अडकत आहे. रैना बालपणीची मैत्रिण प्रियंकासोबत सातफेरे घेईल. दिल्लीतील लीला पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा होत असून साडे तीनशे व्हीव्हीआयपी उपस्थित राहातील. पाहुण्यांसाठी व्हेजसह नॉनव्हेजची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, हे लग्न लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असल्याचे खुद्द रैनाने म्हटले आहे. प्रियंकासोबत त्याची पहिल्यांदा 2008 मध्ये दिल्ली एअरपोर्टवर भेट झाली होती. प्रियंका ही रैनाच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे. रैना विश्वचषक खेळण्यासाठी गेला होता तेव्हाच त्याची आई आणि प्रियंकाच्या आईने विवाहाची संपूर्ण बोलणी पक्की केली होती.

नॉनव्हेजची खास व्यवस्था
हॉटेल लीला पॅलेसच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पाहुण्यासाठी खास पाहुणचाराची व्यवस्था करण्‍यात आली आहे. रैनाच्या सांगण्यावरून नॉनव्हेजची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. लखनऊमधील टुंडे कबाब बनवणार्‍या आचारीला बोलवण्यात आले आहे. याशिवाय नॉनव्हेजमध्ये मटण कोरमा, बिर्यानी, चिकन काका, मुर्ग मेथी, मलाई मटण, लसुनी टिक्का, मुर्ग शाही सीक आणि हांडी चिकनचा मेन्यूमध्ये समावेश असेल.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रैनाच्या लग्नाचे 350 व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी, कपिल देव, विराट कोहली, सुनील गावसकर, रवी शास्त्री, विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड तसेच अन्य सेलिब्रिटींचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, सुरेश रैना आयपीएलनंतर हनीमूनला जाणार