आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India May Break Ceasefire With Pak Modi Cabinet Committee On Security News Marathi

पाकव्याप्त काश्मिरात प्रथमच Indian Army घुसली; 7 तळ उद‌्ध्वस्त, 38 दहशतवादी ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘सैन्य बोलत नाही, पराक्रम गाजवते..’ मन की बातमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ओळीचा अर्थ बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानला समजवला. भारतीय सैन्याने असा पराक्रम गाजवला की, पाकने त्याची कल्पनाही केली नव्हती. सैन्य पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) ३ किलोमीटर आत घुसले. दहशतवाद्यांचे ७ अड्डे उद‌्ध्वस्त करून ३८ अतिरेकी ठार मारले. रात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या सर्जिकल स्ट्राइकनंतर सैन्य आपल्या सीमेत परतले.

हेही वाचा... भारतीय लष्कराने घेतला 'उरी'चा बदला; पाकमध्ये घुसून केला 'सर्जिकल स्ट्राइक'

या संपूर्ण कारवाईत भारताचा एकही जवान शहीद झाला नाही. कारवाईच्या ८ तासांनंतर लष्करी मोहिमांच्या महासंचालकांनी पत्रकार परिषदेत या पराक्रमाची घोषणा केली. त्यानंतर भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली व पाकिस्तानात मात्र भूकंप झाला. नवाझ शरीफ यांनी आधी सर्जिकल स्ट्राइक झाल्याचे मान्य केले, त्याचा निषेध केला आणि पाक लष्कराचा दबाव येताच असे काही घडलेच नसल्याचे घूमजाव केले. त्यानंतर भारताने संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ शूटिंग समोर ठेवले. पाककडून संभाव्य प्रतिक्रिया लक्षात घेऊन भारताने सीमेवरील १० किमीपर्यंतची गावे रिकामी केली. काश्मीर ते गुजरातपर्यंत जवानांच्या सुट्या रद्द केल्या. आम्ही कोणत्याही कारवाईला तयार आहोत, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी सैन्याचे अभिनंदन आणि सरकारच्या कठोर भूमिकेचे स्वागत केले आहे.

पाकिस्तानहून लाइव्ह...
लष्कराच्या बैठका, विरोधी पक्षांचा आज मोर्चा
{पाकचे हवाईदल प्रमुख सोहेल अमन म्हणाले - भारत ज्याला सर्जिकल स्ट्राइक म्हणतोय तो सीमापार गोळीबार आहे. पाकचे रडार सुसज्ज आहे. आमच्या हवाई हद्दीत भारताच्या काहीच हालचाली झाल्या नाहीत.
{लोक संतप्त आहेत. एकदा युद्ध होऊच द्या, एकदाचा प्रश्न निकाली तरी लागेल, असे टॅक्सीचालकही म्हणताहेत. सुशिक्षित लोकांना मात्र नवाझ शरीफ यांना मोदींचे समर्थक मानतात. शाल-साडी डप्लोमसी सुरू असल्याने विरोधक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
{शरीफ यांनी ५ ऑक्टोबरला संसद अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, भारतीय उच्चायुक्त गौतम बंगावले यांना समन्स बजावले आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
5 मुद्यांत सर्जिकल स्ट्राइकची इत्थंभूत माहिती...
अतिरेकी अड्ड्यांवर आल्याची पक्की खबर...
विश्लेषण - दीर्घकालीन धोरणानुसार हा हल्ला ठरला, पुढेही हे धोरण चालू राहील
बातम्या आणखी आहेत...