आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या सर्वेक्षणात परराष्ट्र-रेल्वे मंत्रालयाला 5 स्टार, स्मृती पिछाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारच्या एका वेब पोर्टलने केलेल्या सर्वेक्षणात परराष्ट्र, रेल्वे आणि रस्ते आणि परिवहन मंत्रालयाला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. सरकार स्थापनेपासून चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय कामाच्या बाबतीत मगे पडले आहे. MyGov पोर्टलने एक महिना केलेले सर्वेक्षण गुरुवारी पूर्ण झाले. मोदी लवकरच त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सर्वेक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोदींना अहवाल दिला जाईल
- मीडिया रिपोर्टनुसार या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल पतंप्रधान कार्यालयाला सादर केला जाणार आहे.
- नुकतीच कॅबिनेटमध्ये फेरबदल करण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण आल्यामुळे आता कोणाला नारळ मिळणार याबद्दल तर्क लढवले जात आहेत.
- शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एचआरडी मंत्रालयाला फक्त 35% गुण मिळाले आहेत.
- ब्लॅक मनी परत आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नावरही लोक खूष नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
- 14% लोकांनी यामुदद्यावर सर्वात कमी अर्थात 1 रेटिंग दिले आहे.
काय सांगते सर्वेक्षण
- सर्वमध्ये मोदी सरकारच्या प्रो-अॅक्टिव्ह फॉरेन पॉलिसी आणि रेल्वे मंत्रालयाच्या आधुनिकीकरणाला चांगले गुण मिळाले आहेत.
- रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्यानंतर महाराष्ट्रातील दुसरे मंत्री नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयाचे कामही चांगले सुरु असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
- या मंत्रालयाला जवळपास 60 टक्के लोकांनी सर्वोत्तम (5 स्टार) रेटिंग दिले आहे.
- महिनाभर चाललेल्या या सर्वेक्षणात जवळपास 2 लाख 7 हजार लोकांनी सरकारच्या कामकाजावर आणि त्यांच्या आगामी योजनांवर आपले मत व्यक्त केले.
पुढील स्लाइडमध्ये, इतर मुद्यावर काय आहे स्थिती
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...